Advertisement

अंबाजोगाईत धावत्या इलेक्ट्रिक बाईकने घेतला पेट

प्रजापत्र | Monday, 21/11/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - शहरातील मुख्य रस्त्यावर एका धावत्या इलेक्ट्रिक बाईकने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालकाने गाडीवरून उडी मारल्यामुळे त्याचे प्राण बचावले. मात्र, या दुर्घटनेत दुचाकी जळून खाक झाली. ही घटना सोमवारी (दि.२१) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ जयवंती पुलाच्या नजीक घडली. या घटनेने इलेक्ट्रिक बाइक्सच्या सुरक्षिततेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

 

 

बर्दापूर (ता. अंबाजोगाई) येथील संदीप सत्यनारायण बजाज यांची ही बाईक होती. एक वर्षापूर्वीच त्यांनी सदरील बाईक खरेदी केली होती. अंबाजोगाईतील आम आटोपून ते बर्दापूरला जाण्यासाठी निघाले होते. जय्व्णती नदीच्या पुलावर असताना अचानक गाडीतून धूर येऊ लागल्याने गाडीने पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी ताबडतोब वेग कमी करत गाडीवरून उडी मारली. क्षणार्धात बाईक आगीच्या ज्वाळात वेढली गेली अगदी काही मिनिटात भस्मसात झाली. सुदैवाने संदीप बजाज यांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांना कसलीही इजा झाली नाही. बाईक पेटल्याचे पाहताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. वाहतूक पोलिसांनी तातडीने धाव घेत लोकांना बाजूला काढले आणि वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला. दरम्यान, अग्निशमन दलाला संपर्क साधूनही गाडीचा खाक होईपर्यंतही अग्निशमन गाडी घटनास्थळी पोहोंचली नव्हती. 

Advertisement

Advertisement