Advertisement

विवाहित तरुणाची गळफास घेत आत्महत्या

प्रजापत्र | Saturday, 19/11/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.१९ (प्रतिनिधी)-हत्तीखाना परिसर येथे विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली आहे.
     अंबाजोगाईच्या मिलिंद नगर येथील रहिवासी राहूल नर्सिंग पोटभरे (वय-२८) याचे शुक्रवारी दुपारी चार वाजता कुटुंबियांशी  फोनवर शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर शनिवारी (दि.१९)सकाळी जनावरासाठी चारा आणावयास गेलेल्या व्यक्तीला राहुल याचा मृतदेह दिसून आला. घरगुती किरकोळ वादामुळे रागाच्या भरात हत्तीखाना परिसर येथील घोडके यांच्या शेतात बाभळीच्या झाडास दोरीने गळफास घेऊन राहुलने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. 
राहुल याच्या आत्महत्यामुळे पोटभरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ ,भावजय पुतणे, पत्नी असा परिवार आहे राहुल याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात आणला आहे.राहुल पोटभरे यांचा अंतिम संस्कार विधी दासोपंत समाधी परिसर रेणुकाईदेवी मंदिर रोडवर शनिवारी करण्यात आला. 

Advertisement

Advertisement