बीड दि.०६ (प्रतिनिधी) : भरधाव वेगातील खासगी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवार (दि.५) रात्री 10.30 वाजता अंबाजोगाई - लातूर रोडवर पोखरी ते सायगाव दरम्यान झाला.
अंबाजोगाईतील कपड्याच्या दुकानातील काम पूर्ण करण श्रीमंत शिंदे (वय 19, रा. सुगाव), व्यंकटी पवार (वय 26, रा. सुगाव) आणि नामदेव मोतीराम चव्हाण (वय 25, रा. नांदगाव) हे तिघे शनिवारी रात्री दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. रात्री 10.30 च्या सुमारास पोखरी ते सायगाव दरम्यान महामार्गावर असताना भरधाव वेगातील खासगी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात करण शिंदे याचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बातमी शेअर करा