Advertisement

जुन्या मोंढ्यातील तीन दुकाने चोरटयांनी फोडली

प्रजापत्र | Saturday, 05/11/2022
बातमी शेअर करा

माजलगाव दि.५ (प्रतिनिधी)-माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात चोरटे राज वाढत असून त्याचे नाक कापत शहरातील जुन्या मोंढ्यातील तीन दुकाने फोडत जवळपास लाख रुपयाचा माल लंपास केला असून नेमके शहर पोलीस करतात काय असा प्रश्न व्यापारी बांधवातून उपस्थित करण्यात येत आहे.

 

 

      शहरातील जुन्या मोंढ्यात असणाऱ्या मुंदडा मशिनरी,बजरंग हार्डवेअर,वांगीकर मशिनरी हे दुकाने शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरी करत शहर पोलिसांचा नाकर्तेपणा शहरासमोर आणला.शुक्रवारी पहाटेच्या वेळेला सदरील घटना घडल्या असल्याचे बोलले जात असून या तीन दुकानातून जवळपास एक लाखाच्या जवळपास मुद्देमाल लंपास झाला आहे नेमके शहर पोलीस करतात काय असा सवाल नागरिक व्यापारी उपस्थित करत असून पोलिसांच्या ढिसाळ कामचुकार पणा मुळे शहरात चोऱ्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढच होत असून यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहर पोलिसांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी असे व्यापारी वार्गातून मागणी होत आहे. पोलीस हे सुस्त असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त असून सदरील घटनेचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती.

Advertisement

Advertisement