चौसाळा दि.२ (प्रतिनिधी)-येथील बूट,चप्पल विक्रेते असलेल्या एका ४५ वर्षीय व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.१) रात्री घडली.विलास पंढरीनाथ बोबडे (वय-४५) असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे.
पंढरीनाथ बोबडे हे मंगळवारी दिवसभर दुकानात होते.त्यानंतर रात्री ते दुकान बंद करून घरी आल्यानंतर आपल्या रूममध्ये पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली असून बुधवारी (दि.२) सकाळी चौसाळा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.चौसाळ्यातील वाहतुक नियंत्रक कचरू बोबडे यांचे ते बंधू होते.
बातमी शेअर करा