बीड दि.१ (प्रतिनिधी) - इन्स्टाग्राम अॅपवर झालेल्या ओळखीनंतर पिडित विद्यार्थीनीस पुण्यात बोलावुन तिला प्रेमाचे, लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केले. त्याचा व्हिडीओ काढुन तो व्हिडीओ तुझ्या नातेवाईकांना पाठवून बदनामी करीन अशा पध्दतीने ब्लॅकमेल करत बीडच्या विद्यार्थीनीवर सतत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आली आहे. सदर नराधमाने दोघांचे अश्लिल फोटो पिडितेच्या नातेवाईकांसह मित्र-मैत्रिणींना पाठवल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका 23 वर्षीय विद्यार्थीनीची पुण्यातील सांडस रांजणगाव येथील एका तरूणाशी इन्स्टाग्राम अॅपवर ओळख झाली. दोघे इन्स्टाग्रामसह व्हॉट्सअॅपवर बोलत असत. तरूणाने पिडितेला भेटण्यासाठी शिक्रापुर पुणे येथे बोलावून माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी लग्न करतो असे आमिष दाखवुन तिच्यावर अत्याचार केले. त्याचा व्हिडीओ काढलाव तिचा ईमेल आयडी मोबाईल मधुन घेवून इन्स्टाग्राम अॅपवर तिचे खाते चालू करून सर्व नातेवाईकांचे मोबाईलनंबर त्याने स्वत:कडे कॉपी केले. त्यानंतर मात्र शारिरीक संबंध करू दिले नाहीस तर तो व्हिडीओ तुझ्या नातेवाईकांना पाठवुन तुझी बदनामी करेल असे म्हणून पिडितेवर अनेकवेळा जबरदस्तीने अत्याचार केले. पिडितेसह स्वत:चे अश्लिल फोटो काढुन तुझ्या नातेवाईकाला पाठवेल असे म्हणून पिडितेच्या आईला टेक्स्ट मॅसेज करून पैशाची मागणी केली. नराधम तरूणाने त्याच्या मोबाईलनंबर वरून पिडितेच्या नातेवाईकांसह 40 ते 50 मित्र मैत्रिणींना दोघांचे अश्लिल फोटो व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्राम अॅपवर पाठवून पिडितेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून शेख शरीफ (जि.पुणे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पो.नि.राठोड करीत आहेत.