Advertisement

बसेसची समोरासमोर धडक

प्रजापत्र | Saturday, 29/10/2022
बातमी शेअर करा

परळी दि.२९ ९प्रतिनिधी) - दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या कारणाने प्रवासी आपापल्या गावी जाण्यास मग्न असतानाच दि.29 ऑक्टोबर रोजी परळी बस स्थानकासमोर 11.50 च्या सुमारास एमएच 14 बीटी 1714 आणि एमएच 20 बीएल 0832 या क्रमकांच्या दोन बसची चालकाच्या चुकीमुळे समोरा समोर धडक झाली आहे. बसच्या या समोरा समोर धडकेमुळे बसमध्ये बसलेले 40/50 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, अपघात झाल्यावर बस स्टँड समोर बघ्याची गर्दी जमली होती, यावेळी प्रवाशांनी दोन्ही बसच्या चालकावर कारवाई करण्याची मागणी केली असून आता राज्य परिवहन महामंडळ दोषी चालकांवर कारवाई करणार की त्यांना अभय देणार यावर सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement