Advertisement

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेला भीषण आग

प्रजापत्र | Saturday, 22/10/2022
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ दि.२२(प्रतीनधी ) - बँक ऑफ महाराष्ट्र आर्य समाज मंदिर जवळ असलेल्या शाखेत शनिवार दि 22 रोजी सकाळी अचानक अचानक भीषण आग लागली.
आगीचे लोट दिसताच स्थानिक नागरिकांनी परळी  नगर परिषदेच्या अग्निशमन दलास याची कल्पना दिली असता अग्निशमन दलाने आग आटोकात आणायचे प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली असून सदरील ठिकाण संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून  संभाजी नगर ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी  दाखल झालेले आहेत. प्रथम दर्शी ही आग  सॉर्ट सर्किट ने आग लागल्याचे अंदाज व्यक्त केला जात असून या आगीत बँकेचे सर्व रेकॉर्ड जळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.परळी नगर परिषदेचे 2 अग्नी बंब, वैद्यनाथ सह साखर कारखाना यांचा 1 व परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र यांचा 1 असे 4  बंब व कर्मचारी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.

 

Advertisement

Advertisement