माजलगाव(प्रतिनिधी)- येथील एका हॉटेल मध्ये खाल्लेल्या अन्नातून पाच जणांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले असता अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी कारवाई करत हॉटेल सील केले.
शहरातील गायत्री हॉटेल मध्ये जेवण केलेल्या चार ते पाच जणांना भाजीतून विषबाधा झाल्याची घटना दि.12 रोजी घडून आली होती,संबंधित बधितांवर शहरातील देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते केलेल्या जेवणातून विषबाधा झाली असे डॉक्टरांनी केलेल्या निदानात निष्पन्न झाले त्यानुसार दि.१३ रोजी या संदर्भात बातमी प्रजापत्र मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती त्याचीच दाखल घेत शहरातील या हॉटेलवर अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी कारवाई करत सदरील हॉटेल सील केले आहे.झालेल्या कारवाई मुळे हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.
बातमी शेअर करा