माजलगाव दि.13 (प्रतिनिधी)ः तालुक्यातील पिंपळगाव नाकले येथील एका 50 वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यु झाल्याची घटना गुरूवारी (दि.13) समोर आली. मागच्या काही दिवसांपासून वीज पडून माणसे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे.
उर्मिला भीमराव भगत (वय 50) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. सध्या अतिवृष्टीमुळे सोयाबिनच्या काढणीला वेग आला असून गुरूवारी पिंपळगाव नाकले येथे उर्मिला भगत या शेतातील सोयाबिन काढल्यानंतर घरी परतत असताना त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्या जागीच ठार झाल्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
बातमी शेअर करा