बीड -जिल्ह्यात पावसाने जोर 'धार' हजेरी लावल्यामुळे पिके भुईसपाट झाली असून बीड तालुक्यांतील बोरफडी जवळच मोहिगिरवाडी येथील एका 44 वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे.
मंगळवारी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या दरम्यान अंगावर वीज पडल्याने मोहरबाई राजेंद्र जाधव या जागीच गतप्राण झाल्या. दरम्यान त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा