माजलगाव : तालुक्यातील मंजरथ येथील काळे वस्तीवर राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नी व मुलगा झोपेत असताना हत्या केल्याची खळबळजनक घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर आरोपीने स्वतःहून घटनेची माहिती पोलिसांना दिली. सदर घटना पहाटे तीन वाजता घडली.
मंजरथ पासून जवळच असलेल्या काळज वस्तीवर वास्तव्यास असलेले पांडुरंग दोडतले कुटुंबासह राहतो. आज पहाटे साखर झोपेत असणाऱ्या पत्नी लक्ष्मी व मुलगा पिल्या या दोघांची पांडुरंग या तीक्ष्णहत्याराने हत्या केली. पत्नी व मुलाची हत्या केल्यानंतर पांडुरंग दोडतलेने ग्रामीण पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
पहाटेच घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन आरोपी पांडुरंग दोडतले यास अटक केली. या घटनेने मंजरथ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटना कशामुळे घडली याचा पोलीस तपास करत आहेत.
बातमी शेअर करा