Advertisement

शेतकऱ्याच्या हलगर्जीपणामुळे शॉक लागून तरुणाचा मृत्यु

प्रजापत्र | Sunday, 09/10/2022
बातमी शेअर करा

केज - वन्य प्राण्यापासून ऊस पिकाचे संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण करून त्यात विद्युत प्रवाह सोडल्याने एका तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना लाडेवडगाव ( ता. केज ) येथे शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. याप्रकरणी संबंधित शेत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

 

 

लाडेवडगाव ( ता. केज ) येथील मयत अशोक विठ्ठल लाड ( वय ३६ ) हा तरुण शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सोयाबीन काढणीला आले का हे पाहण्यासाठी बाबासाहेब मारुती लाड यांच्या शेतात गेला होता. तर बाबासाहेब लाड या शेतकऱ्याने वन्य प्राण्यापासून शेतातील उसाचे पिकाचे सरंक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण करून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. कुंपणात करंट असल्याचे माहीत नसल्याने कुंपणाला स्पर्श लागताच जोराचा शॉक लागून अशोक लाड याचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना उघडकीस येताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या आदेशावरून सहाय्यक फौजदार विलास तुपारे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिला होता. मयताची पत्नी सविता अशोक लाड यांच्या फिर्यादीवरून शेतकरी बाबासाहेब मारुती लाड याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार रियाजोद्दीन शेख हे तपास करत आहेत. 
 

Advertisement

Advertisement