Advertisement

पायी जाणार्‍या वृद्ध महिलेला वाहनाने चिरडले

प्रजापत्र | Sunday, 02/10/2022
बातमी शेअर करा

माजलगाव - पायी जाणार्‍या साठ वर्षीय वृध्द महिलेला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे काल रात्री घडली. धडक देवून वाहन फरार झाले आहे.

 

 

बिस्मीलाबी आमेर उद्दीन शेख (वय 60, रा.गंगामसला) या गंगामसला येथे रस्त्याच्या कडेने पायी जात असताना एका भरधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांना चिरडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवले. मात्र रूग्णालयात जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. आज सकाळी माजलगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.
 

Advertisement

Advertisement