बीड-शहरात गुटख्याची अवैध विक्री सुरु असल्याने अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी व अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी आशियाना हॉटेलसमोरील क्लासिक ट्रेडर्स दुकानातून अंदाजे 50 हजारांपेक्षा अधिक गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई आज दुपारी 12 च्या सुमारास करण्यात आली.
बीड शहरातील आशियाना हॉटेल समोरील क्लासिक ट्रेडर्समधील सय्यद परवेज हे गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती अन्न प्रशासनाला समजल्यानंतर शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास या दुकानात धाड मारत बाबा, आरएमडी, विमल, गोवा आदी गुटखा जप्त करण्यात आला आहे. बाजारात याची अंदाजे किंमत 50 हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या या दुकानाचे मालक फरार झाले असून अन्न प्रशासनाचे अधिकारी दुकानात ठाण मांडून बसल्याचे चित्र आहे.
बातमी शेअर करा