अंबाजोगाई-शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या येल्डा ते मुकुंदराज घाटाच्यामध्ये ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारे टॅक्टर पलटी झाल्यामुळे या अपघातात एका 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यु झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले असून 8ते 10 जणांना किरकोळ मार लागल्याची घटना आज सकाळी 6 च्या दरम्यान समोर आली.
रणजित अमोल कांबळे (वय-11) असे त्या मृत मुलाचे नाव आहे. आज पहाटे येल्डा (ता. अंबाजोगाई) येथील ऊसतोड मजूर टॅक्टरमधून कारखाण्याकडे जात असताना सकाळी 6 च्या सुमारास टॅक्टरचा रॉड तुटल्याने ट्रॉली मुकुंदराज घाटाच्या अलीकडे पलटी झाली. यात एका मुलाचा जागीच मृत्यु झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर 8 ते 10 जणांना किरकोळ मार लागला आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा,नायब तहसिलदार मिलिंद गायकवाड, वरिष्ठ लिपिक नाना गायकवाड, सचिन अंजान, वरिष्ठ लिपीक शेख अन्वर, सारंग पुजारी यांच्या सहकार्यामुळे तात्काळ मदत व सहकार्य मिळाल्याने रुग्णांना तातडीने स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.