Advertisement

बीडमध्ये मुस्लीम महिलांचा रेकॉर्ड ब्रेक मोर्चा

प्रजापत्र | Thursday, 15/09/2022
बातमी शेअर करा

बीड(प्रतिनिधी):-बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणातील दोषींची कारागृहातून सुटका, अल्लाह, रसूल आणि कुरआन वर हेतूपुरस्सर अर्वाच्य भाषेत
करण्यात लिखान,भाषण करणार्याच्या निषेधार्थ गुरुवारी मुस्लीम महिलांचा रेकॉर्ड ब्रेक मोर्चा बीड शहरात दिसून आला.

 बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची माफ केलेली शिक्षा रद्द करून त्यांना पुन्हा शिक्षा द्या, रसूल आणि पवित्र कुरआन बद्दल अपशब्द वापरणार्यांवर कडक कारवाई करा, मुस्लिम धर्मगुरूमौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मागे घ्या,त्यांची सुटका करा, आसाममध्ये होत असलेल्या मदरशाविरूद्ध कारवाई तात्काळ थांबवा, पाडलेले मदरसे पुन्हा बांधा, अल्पसंख्याक समाजावर होत असलेले हल्ले, अन्याय पाहता अ‍ॅट्रॉसिटीसारखा कायदा करा आदि प्रमुख मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या. 


शहरातील किल्ला मैदान येथून सुरु झालेला मोर्चा प्रचंड असाच होता. आपल्या भारत देशात काही देश विघातक लोक हिंदू-मुस्लिम मध्ये
वितुष्ट निर्माण करण्यासाठी जाणून बुजून हेतूपुरस्सर अल्लाह, रसूल आणि पवित्र कुरआन बद्दल वारंवार अपशब्द वापरून दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

या कुरापती संपूर्ण भारत देशात बंद व्हायला हव्यात.देशभरात द्वेषाचे राजकारण सर्रासपणे सुरू आहे. कधी अल्पसंख्यांक समाजावर अन्याय तर कधी समाजातील लोकांवर हल्ले तर कधी मुस्लिम धर्माचे पैगंबर यांच्याबाबत अपशब्द काढून मुस्लिमांच्या भावना चिरडल्या जात आहेत. अशा भयावह आणि भीतीदायक परिस्थितीत अखंड भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षात संविधानाला मुठमाती देत सरकार हत्या आणि बलात्कार करणार्याची बाजू घेत त्यांची शिक्षा माफ करत आहेत.


 अशा सरकारच्या विरोधात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा संविधान बचाव समितीच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी हा मोर्चा निघाला तशाच प्रकारचे मोर्चे अन्य तालूक्यातही निघाले.

 

Advertisement

Advertisement