बीड - बीड बायपासवर इनेव्हा गाडीने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. जखमीला सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल केले.
चंदू काळे (रा. भूम) हे आपली दुचाकी (क्र. एम.एच. 14 ए.एल. 8468) या गाडीने बीड बायपासने जात असताना समोरून आलेल्या एका इनेव्हा गाडी चालकाने त्याला भरधाव वेगात जोराची धडक देऊन पळ काढला. अपघातात जखमी झालेले काळे हे रस्त्यावर मदतीसाठी याचना करत होते. या वेळी तेथून जाणारे सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर बाळासाहेब कदम यांनी महामार्ग अॅम्ब्युलन्सला याची माहिती दिली. अॅम्ब्युलन्स काही मिनिटितच घटनास्थळी दाखल होत जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे काळे यांना वेळेवर उपचार मिळाले.
बातमी शेअर करा