Advertisement

‘त्या’ आरोपींला पोलीस कोठडी

प्रजापत्र | Monday, 29/08/2022
बातमी शेअर करा

बीड -  परळी औष्णीक केंद्र परिसरातील राख चोरण्याच्या उद्देशाने स्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. काल त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

 

 

परळी औष्णीक विद्युत केंद्राच्या परिसरात राखेची चोरी करण्यासाठी त्याठिकाणी जिलेटीनद्वारे स्फोट करण्याच्या तयारीत असताना परळी पोलिसांनी मारुती काचगुंडे, हरिदास तुकाराम जाधव या दोघांना ताब्यात घेतले तर यातील एक जण फरार झाला होता. ताब्यात घेतलेल्या दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
 

Advertisement

Advertisement