Advertisement

रुग्णावर शस्त्रक्रिया करून काढला 15 ते 24 सेमीचा अपेंडीस

प्रजापत्र | Saturday, 27/08/2022
बातमी शेअर करा

बीड (प्रतिनिधी) - येथील जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांची कर्तव्य तत्परता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. पोळ्याच्या सणासाठी माजलगावला गेल्यानंतर अपेंडीसचा आजार असलेला एक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याला प्रचंड वेदना होत होत्या.त्याची माहिती कळताच तासाभरात त्यांनी बीडमध्ये येवुन त्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली. डॉ.साबळे आणि डॉ.अभिषेक जाधव या दोघांनी शहेबाज शेख (वय 25) रा.मोमीनपुरा बीड याच्या पोटातील 15 ते 24 सेंटीमीटरचा अपेंडीस यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढला. त्यांनी बीडमध्ये येवुन त्या रुग्णावर  शस्त्रक्रिया केली. डॉ.साबळे आणि डॉ.अभिषेक जाधव या दोघांनी शहेबाज शेख (वय 25) रा.मोमीनपुरा  बीड याच्या पोटातील 15 ते 24 सेंटीमीटरचा अपेंडीस यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढला.
 

Advertisement

Advertisement