Advertisement

विहिरीत पडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

प्रजापत्र | Tuesday, 23/08/2022
बातमी शेअर करा

केज - केज तालुक्यातील एकुरका येथे विहिरीत पडुन बापलेकाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. नटराज रामहरी धस (वय 33) आणि सोनू ऊर्फ रोहन नटराज धस (वय 13) अशी मृत बाप-लेकाची नावे आहे. एकुरका (ता. केज) येथील चौथीच्या वर्गात शिकत असलेला मुलगा सोनू सोमवारी शाळा सुटल्यानंतर वडिलांसोबत शेतात गेला होता. 

 

 

rohan धस यावेळी माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातील राजाभाऊ धस यांच्या विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला. पाय घसरून तो विहिरीत पडून गटांगळ्या खात असल्याचे त्याच्या वडिलांना दिसले. नटराज यांनी विहिरीत उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहन याने त्यांच्या गळ्याला मिठी मारल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. विहिरीजवळ अन्य दुसरे कोणी नसल्यामुळे ते दोघे बाप-लेक विहिरीत पडल्याची कोणालाही माहिती मिळाली नाही. त्यामुळे ते डोघेही रात्री घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. शेतात जाऊन पाहिले असता विहिरीच्या कडेला चप्पल, चॉकलेटचे कागद आणि चिप्सचा पुडा आढळून आला. त्यावरून ते दोघे विहिरीत पडले असल्याचा अंदाज केला. गावकर्‍यांनी विहिरीत मोराटी टाकून आणि गळ टाकून शोध घेतला. परंतु तपास लागला नाही. त्यानंतर पाण्यात कॅमेरा सोडून शोध घेतला. मुरुड येथून एका व्यक्तीला बोलावून त्याच्या मदतीने गळ सोडून दोघांचे मृतदेहवर काढले. यावेळी उपस्थित महिला आणि नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.

 

 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशानुसार नांदूरघाट पोलीस चौकीचे मेसे आणि रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेद नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. बापलेकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
 

Advertisement

Advertisement