परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
शहरातील सर्व परिचित ॲड. गिरीश बालासाहेब राजूरकर यांचे आज दि.१७ रोजी पुणे येथे हृदयविकाराने अकाली निधन झाले. मृत्यूसमयी ते 44 वर्षे वयाचे होते. ॲड.राजूरकर यांच्या आकस्मिक निधनाने सर्व स्तरातून शोक संवेदना व्यक्त होत आहेत.
परळी येथील मूळ रहिवासी व पुणे येथे कार्यरत युवा वकील ॲड. गिरीश बालासाहेब राजूरकर यांना आज दिनांक 17 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, भावजई असा मोठा परिवार आहे.ॲड. गिरीश राजूरकर हे परळी शहरात सर्व परिचित व्यक्तिमत्व होते. विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात ते नेहमी सक्रिय होते. आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुणे येथे वकील म्हणून कार्यरत होते. राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांचा दांडगा संपर्क होता. मोठा मित्रपरिवार व नेहमी प्रत्येक कार्यात अग्रेसर राहणारा युवक म्हणून त्यांची ओळख होती. परळी येथील क्षेत्र उपाध्याय स्वर्गीय बालासाहेब राजूरकर यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक संवेदना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने राजूरकर परिवारावर कोसळलेल्या या दुःखात दै प्रजापञ परिवार सहभागी आहे.
उद्या परळीत अंत्यसंस्कार
दरम्यानॲड. गिरीश राजूरकर यांच्या पार्थिवावर परळी येथील मोक्षधाम स्मशानभूमीत उद्या दिनांक 18 रोजी सकाळी ९३० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. राजूरकर निवास आंबेवेस येथून अंत्ययात्रा निघणार आहे.