चाकण-आज बा. मा. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिरदवडी चाकणमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रभात फेरी कवायत खडे प्रकार घेण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रा. तानाजी पवार हे होते.ध्वजारोहण संस्थेचे सचिव आमचे मार्गदर्शक तरुण मित्र ईशान पवार यांच्या हस्ते पार पडले.व्यासपीठावर पालक संघाचे श्री.शेख, श्री विजय चव्हाण सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रभारी मुख्याध्यापक यांनी केले. विद्यार्थी मनोगते व पाहुण्यांची मनोगत झाली.नियोजन व आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख व क्रीडा विभाग प्रमुख ग्रामपंचायत बिरदवडीकडून विद्यार्थ्यांना खाऊ व बिसलरी बॉटल वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री भामरे यांनी केले. या कार्यक्रमांची माहिती विद्यालयाचे शिक्षक दादासाहेब ढाकणे यांनी दिली.