घाटनांदूर-येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील दुकानावर पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाय यांच्या पथकाने( दि.४) गुरुवारी दुपारी दोन वाजता धाड टाकून ५९ हजार ५६० रुपयांच्या किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केली आहे.
सर्वत्र गुटखा विक्रीस बंदी असताना येथे मात्र खुलेआम पानपट्टी, किराणा दुकानातून किरकोळ गुटखा, सुंगधी तंबाखूची विक्री केली जात आहे. तर येथील काही प्रतिष्ठित व्यापारी परराज्यातून गुटखा आणून परिसरातील वाडी तांड्यावर गुटख्या ठोक विक्री करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाय यांच्या पथकाने गुप्त खबऱ्याच्या महितीवरून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील हॉटेलमध्ये विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आलेल्या गुटख्याची महिती मिळताच जायभाय यांच्या पथकाने धाड टाकून विशाल भास्कर जाधव (रा. घाटनांदूर ) बाबुराव श्रीपती मुसळे (रा धर्मापुरी ता.परळी) यांना ५९ हजार ५६० रुपयांचा गुटखासह ताब्यात घेण्यात आले असून पोलीस हे.का.नितीन आतकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा