Advertisement

महिलेची सोशल मिडियातुन बदनामी

प्रजापत्र | Wednesday, 03/08/2022
बातमी शेअर करा

बीड (प्रतिनिधी) - घटस्फोट झाल्यानंतरही पहिल्या पतीकडून सोशल मिडियावर अश्लिल कमेंटच्या पोस्ट करून बदनामी केली जात असल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

बीड शहरातील एका महिलेचा कौटूंबिक कारणास्तव घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिच्या कुटूंबियांनी तिचे दुसरे लग्न करून दिले. मात्र पहिल्या पतीकडून वारंवार अश्लिल कमेंट सोशल मिडियातुन पोस्ट केल्या जात होत्या. मात्र तो नात्यातील असल्यामुळे आत्तापर्यंत पिडितेने तक्रार केली नव्हती मात्र दोन दिवसांपुर्वी पुन्हा त्याने सोशल मिडियातुन महिलेविरूध्द अश्लिल पोस्ट करत तिची बदनामी केली. सदर बदनामीला कंटाळुन महिलेने दिल्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात कलम 354-अ, 354-ड, 500,501,506 भांदवीसह कलम 67 माहिती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पो.नि.सानप करीत आहेत.
 

Advertisement

Advertisement