केज - तालुक्यातील टाकळी येथे अनेक पिढ्यापासुन नागपंचमी या सणाच्या अनुषंगाने गावामध्ये चार दिवसा अगोदर पासुन जुगार नावाचा खेळ गावातील तसेच बाहेरगावचे लोक खेळत असतात. त्याच परंपरे नुसार या वर्षीही नागपंचमी सणाच्या पहिल्याच दिवशी गावात सुरु असलेल्या जुगारावर केज पोलीसांनी दंबग कारवाई करत जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेत मोठा ऐवज जप्त केला असल्याची माहिती समोर आली आहे. सदर कारवाईमुळे केज तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे तर जुगार्याचे मात्र धाबे दनानले आहेत.
यामध्ये अनेक धनदांडगे जुगारी यांच्या आठरा दुचाकी सह जुगाऱ्यांना ताब्यात घेत केज पोलीस स्टेशनला आणले असून मोठी रक्कम ताब्यात घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती मात्र पुढील कारवाई सुरु आहे .
बातमी शेअर करा