Advertisement

काँक्रीटने भरलेले टँकर पुलावरून कोसळले

प्रजापत्र | Wednesday, 20/07/2022
बातमी शेअर करा

केज दि.२० – केज-अंबाजोगाई रोडवरील कोद्री पाटी जवळ एक रेडी रेकनरचे सिमेंट काँक्रीटने भरलेले टँकर पुलावरून नदीत कोसळले. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झालेली नाही.

 

 

             केज – अंबाजोगाई महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून; काल दि. १९ जुलै रोजी रात्री ८ वा. च्या सुमारास चंदनसावरगाव येथील बस स्टँडवर एका कारने दोघांना चिरडले होते. त्यात दोघांचा जागीच मृत्यू आणि कार मधील दोघे जखमी झाले आहेत. तर आज दि. २० जुलै बुधवार रोजी दुपारी १२ वा. सुमारास रेडी रेकनरचे सिमेंट काँक्रीट भरलेले टँकर क्र. (एम एच-१५/एफ व्ही- ५१५८)  हे अंबाजोगाईच्या दिशेने जात असताना होळ आणि लोखंडी सावरगाव दरम्यानच्या कोद्री पाटी जवळील पुलावरून नदीत कोसळले. त्यात टँकरचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने चालक बचावला असून कोणतीही जीवित हानी झाली नाही.

 

 

             दरम्यान या रस्त्यावरील अनेक कामे अर्धवट असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याची चर्चा नागरिक आणि प्रवाशांत सुरू आहे.
 

Advertisement

Advertisement