अंबाजोगाई:पत्नीचा खुन केल्यामुळे जन्म ठेपेची शिक्षा झालेला आरोपी एक महिन्याच्या पॅरोलवर कारागृह बाहेर आला. मात्र एक महिना झाला तरी तो परत कारागृहात पोहोचला नाही त्यामुळे कारागृह अधीक्षकाने त्यास पत्र पाठवून, गावाकडे शोध घेऊन देखील मिळवून आला नसल्यामुळे अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात फरार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.त्याला अखेर जेरबंद करण्यात आले.
अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा येथील मानसिंग प्रभू राठोड याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन 2017 साली तिचा कुराडीने घाव घालून खून केला होता त्यामुळे या खुण्याचा तपास होऊन त्या खुनाच्या गुन्ह्यांमध्ये राठोडयास जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. त्यानुसार तो हरसुल कारागृह औरंगाबाद येथे शिक्षा भोगत होता कारागृहामध्ये त्याची वर्तणूक चांगली व बरेच वर्षे झाल्यामुळे त्यास पेरोलवर एक महिन्याच्या सुट्टी मिळाली होती व सुट्टी नंतर परत त्याच कारागृहामध्ये हजर व्हायचे होते मात्र तो हजर झाला नव्हता तो कधी पुणे मुंबई इकडे तिकडे भटकत राहिला व अटकेस टाळाटाळ करू लागला त्यामुळे फरार असलेल्या आरोपीचा पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र तो मिळून येत नव्हता आज पहाटे तो राडीतांडा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे या गुन्ह्याची तपास पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बळीराम बासर, स्वपनिल शिनगारे, घुगे यांनी राडीतांडा येथे जाऊन उसाच्या शेतात लपलेल्या मानसिंग राठोड यास ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास औरंगाबाद येथे हरसुल कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.