बीड: ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हापरिषद, पंचायत समित्यांसाठिची आरक्षण सोडत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हापरिषद, पंचायत समित्यांसाठी उद्या दि. १३ रोजी आरक्षण सोडत होणार होती. ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे ओबीसी प्रवर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील जिल्हापरिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत रद्द करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज दिले. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची याचिका सुरु असून त्यात १९ जुलै ला पुढिल सुनावणी असल्याचा दाखला देत आयोगाने आरक्षण सोडत पुढे ढकलली आहे.
बातमी शेअर करा