बीड - जिरेवाडी येथील एका 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदरील आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
प्रतीक्षा राघू खरसाडे (वय 17 वर्षे) या अकरावी वर्गात शिकणार्या विद्यार्थीनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलीस ठाण्याला कळवल्यानंतर ठाण्याचे उबाळे, वाघ यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तरुणीच्या आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी प्रथमदर्शनी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बातमी शेअर करा