Advertisement

बस स्थानक परिसरात युवकाची आत्महत्या

प्रजापत्र | Friday, 08/07/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर - धारुरच्या बस स्थानक परिसरात युवकाची विष   घेवून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी घडली. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली असून युवकाला शहरातील ग्रामीण रुग्णालयात हलवले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

 

 

धारूर तालुक्यातील आसोला येथील तरुण श्रीकृष्ण मोहन चोले (वय २७ वर्षे) हा आज शुक्रवारी आठवडे बाजार दिवशी धारूर येथे आला होता. त्याने सकाळी  बसस्थानका शेजारील मोकळ्या मैदानात  विषारी औषध घेऊन आत्महत्या  करण्याचा प्रयत्न केला. विषारी औषध प्राशन केल्याने तो तेथे तडपडत असल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ परिसरातील नागरिकांनी धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले.

 

 

रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यानी तपासणी केली असता  तो मयत झाल्याचे घोषित केले. या आत्महत्ये प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली आहे.  या तरूणाच्या निधनामुळे   सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या  पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील भाऊ, असा परीवार आहे. मयत मुलाचे वडील आषाढी वारीला पायी दिंडीत गेल्याचे समजते.
 

Advertisement

Advertisement