बीड: राज्यभरात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आहे. निवडणूक आयोगाने काल जिल्हापरिषद, पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद, पंचायत समित्यांसाठी मतदार यादी अंतिम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता ८ आॅगस्ट ला गट, गण निहाय मतदार यादी अंतिम होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद, पंचायत समित्यांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता १८ जुलै रोजी प्रारुप यादी जाहीर होणार आहे. त्यावर आक्षेप आणि सुनावण्यानंतर ८अॉगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर होईल. त्यानंतर केवळ निवडणूक कार्यक्रमाची घोषणा बाकी असेल.
बातमी शेअर करा