Advertisement

लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाचा कोरड्या विहिरीत पडून मृत्यु

प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा

शिरूरघाट येथील घटना 
केज दि.२८ - लघुशंकेसाठी गेलेल्या ३२ वर्षीय तरुणाचा पाय घसरून कोरड्या विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील शिरूरघाट येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. 
शिरूर घाट येथील गोपालसिंग बाबूसिंग ठाकूर ( वय ३२ ) हा तरुण २७ मे रोजी रात्री आपल्या घरी झोपला होता. रात्री १२ वाजता झोपेतून उठून लघुशंकेसाठी घरापासून जवळच असलेल्या विहिरीवर जवळ गेला. विहीर ही जुनी आणि पडझड झालेली होती, शिवाय विहिरीत पाणी नसल्याने तो विहिरीच्या काठावर लघुशंका करीत असताना त्याचा पाय घसरल्याने तो विहिरीत पडला. त्यातच गोपलसिंग ठाकूर याचा जागीच मृत्यू झाला. २८ मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच नांदूरघाटचे बिट जमादार मुकुंद ढाकणे व पोलिस नाईक शिवाजी सानप यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मुकुंद ढाकणे व पोलीस नाईक बाळू सोनवणे हे पुढील तपास करत आहेत. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Advertisement

Advertisement