Advertisement

लाईनमनचे घर फोडले

प्रजापत्र | Monday, 02/05/2022
बातमी शेअर करा

किल्ले धारूर दि.2 मे - शहरातील एमएसईबीच्या कर्मचारी निवासस्थानी (Staff quarters) राहणाऱ्या एका लाईनमनच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. यात घरातील नगदी रकमेसह सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. याबाबत अद्याप पोलिसांत (Police) गुन्हा नोंद नाही.

 

मिळालेल्या माहितीनूसार शहरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारात वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चार कर्मचारी निवासस्थाने आहेत. यातील एका निवासस्थानात वीज कंपनीचे कर्मचारी लाईनमन राजाभाऊ रामभाऊ चाटे हे राहतात. आज आपल्या निवासस्थानी गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले.

लाईनमन राजाभाऊ रामभाऊ चाटे यांनी दिलेल्या माहितीनूसार गेल्या दोन महिन्यापुर्वी आजारी असल्यामुळे ते शासकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे ॲडमीट होते. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक महिन्याची आजारी रजा टाकून गेले होते. दि.7 एप्रिल रोजी आपल्या क्वार्टरवर येवून त्यांनी साफसफाई केली व परत गेले. यानंतर थेट आज दि.2 मे रोजी निवासस्थानी आल्यानंतर सदर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

 

यानंतर लाईनमन राजाभाऊ रामभाऊ चाटे यांनी थेट धारुर (Dharur) पोलिस ठाणे गाठले. फिर्यादीच्या म्हणन्यानुसार घरातील मागील दरवाजा तोडून अज्ञात चोरटे घरात शिरले. घरातील सामान अस्ताव्यस्त करुन कपाटातील नगदी 20 हजार व दिड तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या चोरीची अद्याप पोलिसांत नोंद झालेली नाही. 

 

( Thieves break into Lineman's house in Dharur; Stolen gold along with cash. )

Advertisement

Advertisement