Advertisement

युवकाची बेल्टने गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 25/04/2022
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.२५(वार्ताहर)-येथील शेतात राहणाऱ्या २६ वर्षीय युवकाने तेलगाव रोडवरील डोंगरावर लिंबाच्या झाडाला कंबरेच्या बेल्ट ने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना २५ एप्रील रोजी उघडकीस आली. मनोज कुलकर्णी असे युवकाचे नाव आहे. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

      शहरातील युवक मनोज कुलकर्णी वय २६ वर्ष या  ट्रकटर चालक होता आठ दिवसाखालीच तो कर्नाटक येथून ऊस तोडणीच्या करखान्यावरून परत आला होता. अतिशय मेहनती व मायाळू असल्याने परिसरात मनोजची आत्महत्या झाल्याचे  कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. मनोज सकाळी घराच्या बाहेर पडला होता. सायंकाळच्या सुमारे ५ च्या वेळी  येथील युवक मनोज कुलकर्णी (वय २६ वर्षे) याने तेलगाव रोड वरील लिंबाच्या झाडाला कम्बरेच्या बेल्ट ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटना समजताच पोलीस प्रशासन घटनास्थळी आले होते. शवविच्छेदन  ग्रामीण रुग्णालय धारूर येथे पाठवण्यात आला धारूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास धारूर पोलीस करत आहे.
 

Advertisement

Advertisement