Advertisement

मंत्री बँकेच्या तत्कालीन संचालकांच्या जामिनावर झाला हा निर्णय

प्रजापत्र | Monday, 21/03/2022
बातमी शेअर करा

बीड-येथील द्वारकादास मंत्री सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालकांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात सर्वच संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने मंजूर केले आहेत. सर्वच माजी संचालकांची हा मोठा दिलासा आहे.
बीडच्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या बडतर्फ करण्यात आलेल्या संचालकांविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बँकेच्या निधीचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते.यातील सुभाष सारडा यांच्यासह इतर आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर तिसरे जिल्हा सत्र न्यायाधीश न्या.के.आर.पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. सुरुवातीला न्यायालयाने सर्वांनाच अंतरिम जामीन दिला होता.यात अखेर सर्वच आरोपींना न्यायालयाने दिलासा दिला असून अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
आरोपींच्यावतीने बी एस जाजू,मंगेश पोकळे,विवेकानंद सानप, जयप्रकाश जाजू,अंबादास आगे, आर.बी.जाजू, के.के.बियाणी या विधिज्ञांनी बाजू मांडली .

 

Advertisement

Advertisement