Advertisement

वीज वितरणच्या विरोधात केज तालुक्यात युवक चढला बीएसएनएलच्या टॉवरवर

प्रजापत्र | Monday, 07/03/2022
बातमी शेअर करा

केज दि.7 – ट्रान्सफॉर्मेर जळाल्यामुळे शेतातील ऊस वाळत असतानाही वीज वितरणचे अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केज येथे एक युवक टेलिफोन टॉवरवर चढला होता.

 

               माहिती अशी की, दि. ७ मार्च रोजी दुपारी २:०० वा. च्या दरम्यान केज येथील केज-बीड रोड लगत असलेल्या बीएसएनएल च्या टॉवरवर महादेव त्रिंबक घुले हा तरुण चढला होता. त्याच्या शेतातील डीपीवरचा ट्रान्सफॉर्मेर मागील सत्तावीस दिवसा पासून जळाला असल्याने त्याच्या शेतातील वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे त्याच्या शेतातील उभा ऊस जळून जाऊ लागला आहे. या बाबत त्याने जळालेल्या डीपी वरील ट्रान्सफॉर्मर काढून तो दुरुस्त करण्या बाबत अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती करूनही वीज वितरणचे अधिकारी दाद देत नव्हते; म्हणून त्याने शेवटी दि. ७ मार्च सोमवार रोजी दुपारी २:०० वा. च्या दरम्यान महादेव घुले हा बीएसएनएलच्या टॉवरवर चढला होता.
ही माहिती केज पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि अनिल मंदे, उमेश आघाव, बाळासाहेब अहंकारे, समीर पाशा, मंगेश भोले, मतीन शेख, इंगोले हे घटनास्थळी हजर झाले. यांनी महादेव घुले आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्याची समजूत काढून खाली उतरले.

 

Advertisement

Advertisement