Advertisement

गुन्हा रद्द करण्यासाठी शिवसेना रसत्यावर

प्रजापत्र | Saturday, 26/02/2022
बातमी शेअर करा

बीडः रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबारप्रकरणात डॉ. भारतभुषण क्षीरसागर व इतरांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत यासाठी शनिवारी शिवसेना आक्रमक झाली. डॉ. सारिका क्षीरसागर यांच्यासह सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बीडमध्ये पायी आंदोलन करत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.
बीड शहराचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर आणि इतरांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी कोणतीही खातरजमा न करता गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत अशी मागणी डॉ. सारिका क्षीरसागर, अनिल जगताप, सचिन मुळूक, बाळासाहेब पिंगळे, विलास विधाते, गणपत डोईफोडे, महेश धांडे आदिंनी केली आहे.

Advertisement

Advertisement