बीड दि.२० (प्रतिनिधी)-नुकत्याच पार पडलेल्या ढेकणमोहा सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आ.संदीप क्षीरसागर गटाच्या पॅनलला चारी मुंड्या चीत करून १३ पैकी १३ उमेदवार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे समर्थक विजयी झाले आहेत.
या सेवा सोसायटी मध्ये ५०३ मतदान होते त्यापैकी ४२८ मतदान झाले असून यामध्ये ३७ मते अवैध ठरली तर वैध मतापैकी माजी मंत्री क्षीरसागर यांच्या समर्थकांना २६० पेक्षा जास्त मतदान मिळाले यामध्ये पॅनल प्रमुख बालाप्रसाद रामधन जाजू, रामभाऊ भोगे, काशिनाथ थापडे, शहादेव थापडे, मनोहर देवकाते, रमेश सिंह ठाकुर, दिलीप देवकते, सर्जेराव जाधव, राधाकृष्ण थापडे,उमेश मेनकुदळे,राम किसन शिंदे, बाजीराव पवार,शेषराव पवार हे तेरा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत तर आ संदीप क्षीरसागर गटाच्या सर्व उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर, जगदीश काळे, दिनकर कदम,विलास बडगे, अरुण डाके, गणपत डोईफोडे, ॲड राजेंद्र राऊत, यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आहेत