Advertisement

विनापरवानगी काढली मिरवणूक,बाईक रॅली

प्रजापत्र | Sunday, 20/02/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.२० (वार्ताहर)-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून शिवजयंती निमित मिरवणूक आणि बाईक रॅली काढल्याप्रकरणी अंबाजोगाई शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील लोमटे यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

          अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.१९) शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिवजयंती मिरवणूक, बाईक रॅली न काढता केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम सोशल डीस्टन्सींगचे पालन करून आयोजित करावा असे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बजावले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावत अंबाजोगाई शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे, सदस्य प्रविण देशमुख, दुष्यंत लोमटे, मेहंदीखान ईस्माईल खान पठाण, हसन मोहंमद चाऊस, मनोज कालीया, निखील सुंदरराव जगदाळे, प्रमोद सिद्राम पोखरकर, जयसिंग गोपिनाथ लोमटे, सय्यद अतहर सय्यद अजगर, संतोष सदाशिव काळे (सर्व रा.अंबाजोगाई) यांनी शहरातून  बाईक रॅली आणि भव्य मिरवणूक काढली. तसेच, मोरेवाडी येथील स्वप्नील सुर्यकांत मोरे, प्रविण मोरे, निलेश श्रीकिशन मोरे, अक्षय मोरे आणि शिवराज नरवाडे यांनीही बाईक रॅली काढली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पो.ना. संतोष बदने यांच्या फिर्यादीवरून वरील १६ जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

Advertisement

Advertisement