Advertisement

४५ वर्षीय महिलेचा विनयभंग

प्रजापत्र | Monday, 14/02/2022
बातमी शेअर करा

केज दि. १४ –  शहरातील एका भागात ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली असून महिलेच्या फिर्यादीवरून केज पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. केज शहरात दि.१४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान सोनेराव रामराव घुगे याने फिर्यादीचे गेट वरुन उडी मारुन घरा प्रवेश करुन फिर्यादीस लज्जास्पद बोलून चापट मारून उजवा धरला व वाईट हेतुने आंगाला झोंबाझोंबी केली. तसेच शिवीगाळ करुन जिवेमारण्याचीही धमकी दिली अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे.दरम्यान, सदर महिलेच्या तक्रारीवरून सोनेराव रामराव घुगे रा. होळ ता.केज याच्या विरुद्ध केज पोलीसांत गुन्हा नोंद झाला असून सपोनी शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना रुक्मिण पाचपिंडे ह्या पुढील तपास करत आहेत.
 

Advertisement

Advertisement