अंबाजोगाई - शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या रोडवरील कंपनी बागेतील विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी (दि.०४) दुपारी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. निदा अल्ताफ शेख (वय १६) आणि सानिया अल्ताफ शेख (वय १८) अशी त्या बहिणींची नावे आहेत. त्या फॉलोअर्स क्वार्टर भागात राहत होत्या. शुक्रवारी सकाळी वडील त्यांना मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडून आले होते. दुपारी त्या दोघी तिथून परत येत असताना त्या विहिरीत बुडाल्या. स्थानिकांच्या म्दतिए त्यांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिले. दरम्यान, दोन्ही बहिणी विहिरीत पडल्या कि त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
बातमी शेअर करा