बीड दि.२७ (प्रतिनिधी)-जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या रुग्ण संख्येत भर पडत असताना गुरुवारी (दि.२७) पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.
गुरुवारी (दि.२७) जिल्ह्यामध्ये ११६५ नमुन्यामध्ये १६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात अंबाजोगाई-४७,आष्टी-२१,बीड-४०,धारूर-२, गेवराई-६,केज-८,माजलगाव-७,परळी -१९,पाटोदा-८ तर शिरूरमध्ये नवे ७ रुग्ण आढळून आले.दरम्यान जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी गुरुवारी कोरोनामुक्तांची संख्या १७६ एवढी आहे.त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या आता जिल्ह्यामध्ये वाढू लागल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
बातमी शेअर करा