Advertisement

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 24/01/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२४ (प्रतिनिधी):-दोन वर्षापुर्वी घेतलेले बँकेचे कर्ज व सोसायटीच्या कर्जामुळे आहेर धानोरा येथील ४८ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना सोमवारी (दि.२४) घडली.

 

           महादेव रावसाहेब इंगोले (वय ४८ रा.आहेर धानोरा) यांनी सोमवारी (दि.२४) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. मागील दोन वर्षापुर्वी एसबीआय बँकेचे व सोसायटीचे यांच्यावर कर्ज होते. यंदा शेतामध्ये उत्पन्न न झाल्यामुळे नैराश्यातून इंगोले यांनी आत्महत्या केली. इंगोले यांच्या आत्महत्येने आहेर धानोरा परिसरात व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement