Advertisement

ऊसतोड मजुरांच्या वाहनाचा अपघात

प्रजापत्र | Tuesday, 21/12/2021
बातमी शेअर करा

धारूर - कोयाळ येथून ऊसतोडणीला गेलेल्या मजुरांना घेवून गावाकडे परत निघालेल्या वाहनाला परळी तालुक्यातील सरफराजपुर अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार तर सात जण जखमी झाले. ही घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. धारूर तालुक्यातील कोयाळ येथील ऊसतोड कामगार सोमवारी सकाळी ऊसतोडणीसाठी गेले होते. रात्री कोयाळला परत येत असतांना सरफराजपुरनजिक चालकाचे नियंत्रण सुटून त्यांचे चार चाकी वाहन पलटी झाले. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने विशाल गौतम वाव्हळे वय 18 आणि वैजीनाथ रामा वाव्हळे वय 65 हे दोघे राहणार कोयाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर जीपमधील बाळासाहेब कोंडीबा मुंडे वय 35, विश्‍वनाथ बालाजी वाव्हळे वय 50, रमेश भगवान मुंडे वय 34, रा. सर्व कोयाळ ता.धारूर अरूण नामदेव गायकवाड वय 60, शोभा गायकवाड वय 50, रा. दोघे तळेगाव, अनिता संजय डोंगरे वय 40, संजय दासु डोंगरे वय 50 रा.हिंगणी हे सात जण जखमी झाले. अपघातानंतर कोयाळ ग्रामस्थांनी जखमींना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात दाखल केले. जखमीपैकी बाळासाहेब मुंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लातूरच्या रूग्णालयात हलवण्यात आले. इतर जखमींवर अंबाजोगाईंच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

Advertisement