बीड-तालुक्यातील गोलंग्री येथील एका अडीच वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यु झाल्याची घटना शनिवारी (दि.१८) रात्री उशिरा उघडकीस आली.
बीड तालुक्यातील गोलंग्री येथील अडीच वर्षीय चिमुकला पिल्या बाबुराव मोरे हा त्याच्या आईसोबत शेतात गेला होता. यादरम्यान त्याची आई दुपारी २ वाजता शेतात काही अंतरावर असलेल्या विहिरीवरील मोटार चालु करण्यासाठी गेली.यावेळी पिल्या दुर्दैवाने एकटा असल्यामुळे विहिरीत कल जाऊन पडला आणि यात त्याचा मृत्यु झाला.दरम्यान सर्वत्र शोधाशोध घेऊन ही दिवसभर सापडला नाही.रात्रीच्या ११.३० च्या सुमारास विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलिस स्टेशन चे पी.एस.आय विलास जाधव, पी.एस.आय गायकवाड, पो.ह बाबासाहेब डोंगरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह नेकनुर येथील रूग्णालयात पाठवला असुन पुढील तपास नेकनुर पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा