Advertisement

कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

प्रजापत्र | Friday, 17/12/2021
बातमी शेअर करा

माजलगाव-तालुक्यातील राजेवाडी येथील एका ३३ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

 

 

             माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. जवळपास एक वर्षांपूर्वी त्याचे वडील बाबुराव महागोविंद यांनी विष प्राशन करून आपले जीवन संपवले होते. त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर याने सुद्धा विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना राजेवाडी येथे घडली. कर्जाच्या वाढत्या ताणामुळे ज्ञानेश्वरने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरत सुरु आहे.शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्या पश्चात वृद्ध आई,पत्नी एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे

Advertisement

Advertisement