अंबाजोगाई-तीन दिवसापूर्वी परळी वैद्यनाथ मंदिरा आरडीएक्स लावून उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर आता शनिवारी (दि.२७) रात्री अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला देखील आरडीएक्सने उडवण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे.यामध्ये मला खाजगी व महत्वाच्या कामासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी योगेश्वरी मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन' असे यात म्हटले आहे.
अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला हे पत्र प्राप्त होताच देवल कमिटी चे सचिव अँड.शरद लोमटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात आरोपी प्रभाकर नामदेव पुंड (रा.पिंपळगाव,जि. नांदेड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिराला भेट देऊन संपूर्ण मंदिराची पाहणी केली आणि सुरक्षितता राखण्याच्या सुचना दिल्या आहेत. परळीच्या वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरास ही असे धमकीचे पत्र प्राप्त झाल्याने पोलिसांना आता या प्रकरणाची पाळेमुळे शोधावी लागणार आहेत.