केज - तालुक्यातील नांदुरघाट येथील शाम अलंकार या सोन्याच्या दुकानाचे शटर गुरुवारच्या रात्री तोडून दुकानातील आडीज लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
दि.25 नोव्हेंबरच्या रात्री नांदूरघाट पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या महामुनी यांच्या शाम अलंकार या सोन्याच्या दुकानाचे गुरुवारी रात्री शटर तोडून दुकानातील दोन ते अडीच लाख रुपयांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल चोरट्यांनी लुटल्याचा अंदाज काढला जात आहे.दुकानात असलेले कपाट गावाच्या शेजारील नदीमध्ये नेऊन कपाटाची तोडफोड करून कपाट नदी मध्ये टाकून चोरटे पसार झाले आहेत.
बातमी शेअर करा