Advertisement

सत्यनारायणाची पूजा होताच नवरदेवाची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 22/11/2021
बातमी शेअर करा

माजलगाव-शनिवारी थाटामाटात विवाह सोहळा झाला, त्यानंतर सोमवारी सत्यनारायणाची पुजा झाली. त्याच दिवशी शेतात जावून नवरदेवाने आत्महत्या केली. माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आत्महत्याचे कारण समजू शकले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

 

 

पांडुरंग रामकिसन डाके (वय 26) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील पांडुरंग रामकिसन डाके हा शेती करत होता. त्याचे शनिवारी माजलगाव येथे थाटामाटात विवाह सोहळ संपन्न झाला. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचा सत्यनारायणाची पुजा देखील झाली. सत्यनारायण झाल्यानंतर नातेवाईक व गावातील नागरिक घरी जेवण करत होते. पांडुरंग याने जेवण करून 3 वाजता कोणालाही न सांगता शेताकडे गेला. यावेळी शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पांडूरंगचा मृतदेह आढळून आला. याची माहिती शेजार्‍यांनी घरी दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पांडूरंगने आत्महत्या का केली? असा प्रश्न सर्वांना पडला असून घटनास्थळी माजलगाव ग्रामीण पोलीसांनी धाव घेतली आहे. पुढील तपास सुरु असून शवविच्छेदनानंतर आत्महत्या आहे की, घातपात हे समोर येईल.

Advertisement

Advertisement